Railway Mega Block – दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी (दुहेरीकरण) मेगा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज दि. २५ जानेवारी रोजी नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) चे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या गाड्यांसह डीईएमयू रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वळविण्यात आल्या असून, काही गाड्या उशिराने धावतील.दि. २५ जानेवारी रोजी पुणे-अमरावती, अजनी-पुणे-अजनी एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस (दि. २५ आणि २६ रोजी) नागपूर-पुणे गरीब रथ एक्स्प्रेस, पुणे-नांदेड-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, दौंड-कलबुर्गी स्पेशल, पंढरपूर – निजामाबाद एक्स्प्रेस (दि. २६ रोजी) या महत्त्वाच्या गाड्यांसह सोलापूर-दौंड-सोलापूर डीईएमयू स्पेशल, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे डीईएमयू, पुणे-दौंड-पुणे डीईएमयू, बारामती-दौंड-बारामती डेमू, पुणे-बारामती-पुणे पॅसेंजर, बारामती-पुणे-बारामती डेमू आणि हडपसर-सोलापूर-हडपसर डीईएमयू रद्द करण्यात आले आहे. तसेच दौंड-इंदूर एक्स्प्रेस शाॅर्ट टर्मिनेशन करण्यात आले असून, एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस साडेचार तासांनी तर हडपसर-काझीपेठ एक्स्प्रेस एक तासाने पुनर्निर्धारित केली आहे.