पुणे-सोलापूर मार्गावर रेल्वेचा ब्लॉक

10 जुलैपर्यंत गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल


 दर शनिवार, रविवारी प्रशासन करणार दुरुस्ती

पुणे – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत दौंड ते सोलापूर स्थानकांदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव 10 जुलैपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

1. पुणे-सोलापूर-पुणे या मार्गावर धावणारी इंटरसिटी एक्‍स्प्रेस (12169/12170) दि. 1 जून ते दि. 7 जुलै या कालावधीमध्ये दर शनिवारी आणि रविवारी रद्द करण्यात येणार आहे. अन्य दिवस गाडी नियोजित वेळेमध्ये धावणार आहे.

2. सोलापूर ते पुणे मार्गावर धावणारी डेमू (71414) दि. 29 मे ते दि. 10 जुलै पर्यंत दर शनिवारी आणि रविवारी सोलापूर ते कुर्डूवाडी स्थानकादरम्यान धावणार आहे. कुर्डूवाडी ते पुणे या मार्गावर गाडी धावणार नाही. अन्य दिवस गाडी नियोजित वेळेमध्ये धावणार आहे.

3. पुणे-सोलापूर डेमू (71415) दि. 29 जून ते दि. 10 जुलै या कालावधीमध्ये दर शनिवारी आणि रविवारी पुणे ते भिगवण मार्गावर धावणार आहे. अन्य दिवस गाडी पुणे-सोलापूरपर्यंत धावणार आहे.

4. आठवड्यातून तीन दिवस धावणारी पुणे ते हैद्राबाद एक्‍स्प्रेस (17013) दि. 1 जून ते दि. 6 जुलै या कालावधीमध्ये दर शनिवारी पुणे ते कुर्डूवाडी या मार्गावर धावणार नाही. ही गाडी कुर्डूवाडी स्थानकाहून नियोजित वेळी हैद्राबादकडे रवाना होईल. ही गाडी सोमवार आणि बुधवारी नियोजित वेळापत्रकानुसार पुणे ते हैद्राबाद मार्गावर धावेल.

5. हैद्राबाद-पुणे एक्‍स्प्रेस (17014) दि. 1 जून ते दि. 6 जुलै या कालावधीमध्ये दर शनिवारी हैद्राबाद ते कुर्डूवाडी मार्गावर धावेल. कुर्डूवाडी ते पुणे मार्गावर गाडी धावणार नाही. ही गाडी मंगळवारी आणि शुक्रवारी नियोजित वेळेनुसार हैद्राबाद ते पुणे मार्गावर धावेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.