रायगड: महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली

इमारतीखाली अनेकजण अडकल्याची भीती

रायगड( प्रतिनिधी) – निसर्ग वादळातून बाहेर पडतानाच आता रायगड जिल्हा आज इमारत दुर्घटनेत हादरला आहे. महाडमधील साळीवाडा नाका काजळपुरा भागात एक रहिवासी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार या इमारतीत ४० कुटुंब राहत होते आणि ढिगाऱ्याखाली ७० ते ८० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखालून ६ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान पुण्यातून एनडीआरएफच्या तीन टीम महाड कडे रवाना झाले आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.