रायगड : सध्या पावसाळ्याचा सिझन असल्याने अनेकजण निसर्गाचा आनंद घ्यायला घराबाहेर पडताना दिसत आहेत. कधी कधी हाच आनंद आपल्या अंगलट येताना दिसतो. अशीच एक धक्कादायक रायगडमध्ये घडली आहे. यामध्ये रिव्हर राफ्टिंगनंतर एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे ही घटना घडली आहे. अभिजीत कुलकर्णी असे या मृत पर्यटकाचे नाव असून ते बांद्रा येथील विज वितरण कंपनीमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. अभिजीत कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासह कोलाड येथे पावसाळी पर्यटनासाठी आले होते. शनिवारी त्यांनी कुंडलिका नदी पात्रात रिव्हर राफ्टींग केली आणि नदी पात्रातुन बाहेर पडत असताना अचानक ते खाली कोसळले.
यानंतर त्यांना तातडीने रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी कुलकर्णी यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी कोलाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कोलाड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.