शिरूर -डोंगरगण (ता. शिरूर) गावच्या हद्दीत शिरून पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून सुमारे 25 हजार रुपयांचे आठ कच्चे बॅलर रसायन नष्ट केले आहे.
याप्रकरणी निलेश पोपट नरसाळे (रा. म्हसे ता. शिरूर) याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक गणेश जगदाळे, कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे व कृष्णा व्यवहारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.