राहुल भारतातच जन्मले आणि साऱ्या देशवासियांसमोर लहानाचे मोठे झाले
अमेठी – राहुल गांधी यांना त्यांच्या नागरीकत्वाविषयी खुलासा करण्याची नोटीस केंद्रीय गृहमंत्रालयाने आज बजावली त्याला कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांचा जन्म भारतातच झाला हे सारे देशवासिय जाणतात आणि साऱ्या देशांच्या नागरीकांच्या डोळ्यादेखतच ते येथे लहानाचे मोठे झाले आहेत. असे असतानाही त्यांना अशा प्रकारची नोटीस बजावणे याचाच अर्थ आता भाजपला त्यांचा पराभव स्पष्ट दिसायला लागला आहे असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
त्यांना नागरीकत्वाच्या विषयावरून बजावण्यात आलेली नोटीस हा मुर्खपणा आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. केवळ पराभवाची भीती निर्माण झाल्याने त्यांनी हे केले असावे असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.