राहुल यांच्यासारखे धैर्य थोड्याच लोकांमध्ये – प्रियांका गांधी 

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे राहुल गांधी यांच्या पाठिशी त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वढेरा ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. राजीनाम्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत राहुल यांनी बुधवारी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रियांका यांनी गुरूवारी ट्‌विटरवरून त्यांची भावना व्यक्त केली.

राहुल यांच्या निर्णयाविषयी खूप आदर वाटतो. त्यांच्यासारखी कृती करण्याचे धैर्य थोड्याच लोकांमध्ये असते, असे प्रियांका यांनी म्हटले. राहुल यांच्या निर्णयामुळे आता कॉंग्रेसला नव्या अध्यक्षाची निवड करणे अपरिहार्य बनले आहे. काही कॉंग्रेसजनांकडून प्रियांका यांच्याकडे सुत्रे सोपवण्याची मागणीही होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी कुटूंबातीलच असेल की बाहेरील असेल, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.