रायपूर :– माजी पंतप्रधान राजीव गांधी तसेच अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्याकडून राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आदराची वागणूक दिली जायची. त्या काळातील स्थिती आता राहिलेली नाही.
आजच्या राजकारणात राजकीय सलोखा कमी होत चालला आहे. त्याला केवळ भाजप जबाबदार आहे, असे टीकास्त्र छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी गुरूवारी सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी गांधी परिवारातील सदस्यांविषयी याआधी अनेकदा अयोग्य शब्द वापरले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख मिर जाफर म्हणून करण्यात आला. भाजपला कॉंग्रेस आणि राहुल यांची धास्ती वाटत आहे.
राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर; कपिल सिब्बल यांचा आरोप
भारत जोडो यात्रा काढून राहुल यांनी बेधडकपणे भूमिका मांडली. त्यांनी भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. राहुल यांना लक्ष्य करण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो, असे बघेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.