बॉलीवूडमध्ये “आशिकी’ चित्रपटामुळे अफाट यश मिळलेला अभिनेता राहुल रॉय पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. यावेळी तो “आगरा’ चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कनु बहल करणार आहे. यापूर्वी त्यांनी “तितली’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.
या चित्रपटात राहुलशिवाय प्रियंका बोस, मोहित अग्रवाल, रुहानी शर्मा, विभा छिब्बर, सोनल झा आणि आंचल गोस्वामी आदी कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाविषयी माहिती देताना कनु बहल म्हणाले, हा चित्रपट कौटुंबिक जीवनावर आधारित असून यात सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त अशा जगात स्वतःसाठी एक निवांत क्षण आणि स्पेश शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यात आले असून त्याचे शूटिंग आग्रा आणि आसपासच्या परिसरात करण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढिल वर्षी चित्रपटगृहात येणार आहे. दरम्यान, चित्रपटसृष्टीपासून दुर झालेला राहुल रॉय 2006मध्ये रिऍलिटी शो “बिग बॉस’च्या पहिल्या सीजनचा विजेता ठरल्यानंतर चर्चेत आला होता.