ऋषी कपूर (चिंटू) आता ‘कॅन्सर फ्री’ – राहुल रावेल

बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर हे प्रकृती ठिक नसल्यामुळे अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर ही देखील होत्या. स्वत: ऋषी कपूर यांनी मागील महिन्यात ’29 सप्टेंबर’ रोजी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. तसेच त्यावरील उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे असे सांगितले होते. त्यानंतर ऋषी कपूर हे कॅन्सरने ग्रस्त असल्याच्या अफवा सोशल मीडियावर फिरत होत्या. मात्र, आता या अफवांचा खुलासा झाला आहे.

ऋषी कपूर यांचे जिवलग मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक राहुल राहुल रवैल यांनी सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत एक आनंदाची बातमी दिली आहे. “ऋषी कपूर (चिंटू) आता कॅन्सर फ्री” असं राहुल रवैल यांनी फोटो शेअर करत लिहिले आहे. त्यामुळे नक्की ऋषी कपूर यांना कोणता आजार झाला होता. या गोष्टीचा खुलासा झाला असून, याविषीयी कपूर कुटुंबियांकडून कोणती अधिकृत माहिती मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)