पठाणमथिट्टा : केरळमधील एका न्यायालयाने बुधवारी काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल मामकुटाथिल (Rahul Mamkootathil) यांना त्यांच्यावरील तिसऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणात जामीन मंजूर केला. त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हा जामीन पठाणमथिट्टा जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला. आमदाराने (Rahul Mamkootathil) दाखल केलेल्या अपीलावर न्यायालय सुनावणी करत होते. एका न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता, कारण त्यांच्यावरील आरोप गंभीर होते आणि त्यांचा असाच पूर्वेतिहास होता. Rahul Mamkootathil कोट्टायम जिल्ह्यातील एका महिलेने ८ जानेवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर, पालक्काडच्या आमदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि ५०६(१) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत तिसरा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना ११ जानेवारी रोजी पालक्काड येथे अटक करण्यात आली होती. केरळ उच्च न्यायालय आणि तिरुवनंतपुरम येथील सत्र न्यायालयाने यापूर्वी दोन वेगवेगळ्या महिलांच्या तक्रारींवरून दाखल झालेल्या पहिल्या दोन लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये आमदाराला अटकेपासून संरक्षण दिले होते. हे पण वाचा : विमानाचे अखेरचे क्षण…; अनेकदा उतरण्याचा प्रयत्न, गो-अराउंड, परवानगी, आणि मग अपघात