राहुल यांनी घेतली पर्रिकरांची भेट

पणजी : राफेल प्रकरणाचे गुपित मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूम मधील फायलींमध्ये दडले असल्याचा आरोप करणारे कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांनी आज गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही काळ चर्चा केली. त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच आपण त्यांची भेट घेतल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे. त्यांच्या प्रकृतीला त्वरीत आराम पडावा अशा शुभेच्छाही राहुल गांधी यांनी त्यांना दिल्या आहेत.

गोवा विधीमंडळाच्या संकुलातच राहुल यांनी पर्रिकर यांची आज ही भेट घेतली. राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी हे सध्या गोव्याच्या खासगी भेटीवर आले आहेत. आज ते गोवा विधानभवनात आले. तेथे सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. विधानभवनाच्या आवारात आल्यानंतर राहुल गांधी थेट मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस आमदारांची भेट घेतली आणि त्यांना दहा मिनीटे त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर ते विधानभवनातून निघून गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्रकारांनी त्यांना गाठले असता आपल्याला उशिर होत असल्याचे सांगत ते त्यांच्याशी न बोलताच निघून गेले होते. पर्रिकरांच्या संबंधात त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री विश्‍वजीत राणे यांची ऑडिओ टेप खरी आहे असे ट्विट कालच राहुल गांधी यांनी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज पर्रिकर यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या लक्षणीय ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)