द्वेषमूलक माहितीविरोधात राहुल गांधींची ‘व्हिडीओ’ मोहीम

नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे माहिती दिली असून गांधी हे उद्यापासून चालू घडामोडी, इतिहास व देशावर आजवर आलेल्या संकटांबाबत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहेत.

गांधी यांनी आपल्या या नव्या योजनेबाबत ट्विटरद्वारे माहिती देताना, ‘सध्या भारतीय वृत्त माध्यमांचा एक मोठा हिस्सा फॅसिस्ट हितसंबंधांमध्ये गुंफला गेला आहे. टेलिव्हिजन चॅनेल्स, व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड व चुकीच्या बातम्यांद्वारे द्वेषमूलक माहिती पेरली जातीये. असत्य पसरवले जात असल्याने भारताचं तुकडे-तुकडे होत आहेत.’ असा आरोप लगावला.

आपल्या योजनेबाबत अधिक माहिती देताना ते म्हणतात, ‘सत्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांसाठी चालू घडामोडी, इतिहास व देशावर आजवर आलेल्या संकटांबाबतची खरी माहिती उपलब्ध करून देण्याचा माझा हेतू आहे. यासाठीच मी उद्यापासून तुमच्यासोबत माझे विचार व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.