राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची श्रद्धांजली

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत ‘राजीव गांधी’ यांची आज (दि.21) 28 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने राजीव गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी वडिलांना आदरांजली वाहिली. देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही राजीव गांधींना वीर भूमीवरील त्यांच्या पुण्यसमाधी स्थळी जाऊन आदरांजली वाहिली.

राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाठी मोठे योगदान दिले आहे. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.