नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधींनी झारखंडच्या प्रचारसभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले. या विधानावरून आज लोकसभेत भाजप खासदारांनी मोठा गदारोळ केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी यांचे हे वक्तव्य निंदनीय आहे आणि त्यांना याबाबत शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती. मात्र भारतात कुठेही बघितलं तर बलात्कार होत आहेत. यामुळे मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाला आहे. जर तुम्ही वृत्तपत्रे पाहिलीत तर तुम्हाला कळेल की उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आमदारानं एका मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिचा अपघात घडवून आणला. तरीही मोदी शांत आहेत. मोदी म्हणाले कि, बेटी बचाओ, बेटी पढाओ पण कोणापासून वाचवायचे हे सांगितले नाही. तर नरेंद्र मोदींच्या आमदारापासून मुलींना वाचवायचे आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली होती.
#WATCH Rahul Gandhi, Congress in Godda, Jharkhand: Narendra Modi had said ‘Make in India’ but nowadays wherever you look, it is ‘Rape in India’. In Uttar Pradesh Narendra Modi’s MLA raped a woman, then she met with an accident but Narendra Modi did not utter a word. (12.12.19) pic.twitter.com/WnXBz8BUBp
— ANI (@ANI) December 13, 2019
दरम्यान, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा नेता महिलांवर बलात्कार केला पाहिजे असं स्पष्टपणे सांगत असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हंटले आहे. यावेळी सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळानंतर डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी राहुल गांधींची बाजू घेत, त्यांना काय म्हणायचे होते ते समजून घ्या, असे सांगितले. मात्र यावर स्मृती इराणी आणखी संतापल्या.