शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींचे खास मराठीत ट्विट 

नवी दिल्ली – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खास मराठीतून ट्विट करत अभिवादन केले आहे. तसेच ट्विटच्या शेवटी हॅशटॅगमध्ये ‘शिवाजी महाराज कि जय’, असेही लिहले आहे.

राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे ट्विट त्यांनी केले आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1097725879990521856

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)