करोनाबाबतच्या केंद्राच्या दाव्यावर राहुल गांधी यांचे प्रश्‍न चिन्ह

नवी दिल्ली: करोनाविरुद्धच्या लढाईत भारत चांगल्या स्थितीत असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केला होता. या दाव्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले आहे. शहांचा हा दावा खरा आहे काय, असा प्रश्‍नच त्यांनी आज ट्विटरवर विचारला आहे.

या ट्विटरबरोबरच त्यांनी भारतात वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संबंधातील आलेखही प्रसारित केला आहे. त्यात भारताची तुलना अन्य देशांशीही करण्यात आली आहे. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड अशा देशांतील करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना भारतातील संख्या मात्र लक्षणीय प्रमाणात वाढत आहे असे या आलेखावरून स्पष्ट दिसत आहे.

गेल्या 24 तासांत भारतातील रुग्ण संख्येमध्ये 28 हजार 701 नवीन रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्णांचे प्रमाण हे झपाट्याने नऊ लाखांच्या दिशेने चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्राच्या दाव्यावर प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.