कोल्हापुरात राहूल गांधीच्या पोस्टारला फासलं काळं

कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी देशातील बलात्काराच्या घटनांवर भाष्य करताना वापरलेल्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने आज बिंदू चौक येथे राहूल गांधी यांचा या वक्तव्याबद्दल निषेध करण्यात आला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून देशातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. परंतु राहूल गांधी यांचा ‘रेप इन इंडिया’ हा शब्द प्रयोग देशातील महिलांच्या भावना दुखावणारा आहे.

राहूल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ हा अपशब्द वापरून भारतीय संस्कृतीचा आणि नारीशक्तीचा अनादर केलेला आहे. ज्या देशात प्रभूरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रीच्या सन्मानासाठी कार्य केले अशा भारत देशाबद्दल असे वक्तव्य अपमानास्पद असून राहूल गांधी यांनी देशातील महिलांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी भाजपा महिला पदाधिकारी यांनी राहूल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधी यांच्या प्रतिमेस काळे फासण्यात आले.याप्रसंगी गायत्री राऊत, सुजाता पाटील, स्वाती कदम, आशा रेणके, प्रमोदिनी हर्डीकर, मंगल निप्पाणीकर, शुभांगी चितारी, शोभा कोळी, सुनिता सूर्यवंशी, सविता कोळी, गीता भोसले, सरिता पार्टे, भाग्यश्री आजगावकर आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.