“राहुल गांधी यांच्या कामगिरीची इतिहासात नोंद घेतली जाईल”

श्रीनगर – देशातील सध्याच्या हुकुमशाही राजवटीच्या विरोधात राहुल गांधी हे अत्यंत धैर्याने लढत आहेत. त्यांच्या या कामगीरीची इतिहासात नोंद घेतली जाईल असे कौतुकोद्‌गार पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी काढले आहेत.

ट्‌विटरवर त्यांनी या संबंधात म्हटले आहे की, सध्या नवीन भारताची चर्चा आहे, पण हा नवा भारत केवळ काही मोजक्‍या लोकांसाठीच दिसत आहे. त्याच्या विरोधात बोलण्याचे धाडस दाखवून लोकांपुढे सत्त्य आणण्याचे काम राहुल गांधी हे धैर्याने करीत आहेत. त्यांची कितीही थट्टा उडवली जात असली तरी सत्य मांडण्याचे त्यांचे धैर्य कौतुकास्पदच आहे.

सध्याच्या हुकुमशाहीच्या राजवटीला आरसा दाखवण्याचे त्यांचे कार्य इतिहासात नोंदवले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या हुकुमुशाही राजवटीने देशातील शेतकऱ्यांवर केंद्र सरकारी यंत्रणांमार्फत दडपशाहीं चालवली आहे असा आरोपही मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. एनआयएचाहीं वापर शेतकऱ्यांच्या विरोधात केला जात आहे.

सरकारच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल त्यांना एनआयए मार्फत कारवाईचा धाक दाखवला जात आहे असेही मेहबुबा यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.