राहुल गांधींचा सैन्यापेक्षा पाकिस्तानवर जास्त विश्वास; भाजपचा पलटवार 

नवी दिल्ली – राफेल कराराची कागदपत्रे हरवल्याच्या सरकारच्या दाव्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढविला. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधींना आपल्या सुरक्षा दलापेक्षा पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

रवी शंकर प्रसाद यांनी म्हंटले कि, राहुल गांधी यांना खोटे बोलण्याची सवय झाली आहे. याप्रकरणी कॅग आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. राहुल गांधींना आता पाकिस्तानचे सर्टिफिकेट पाहिजे आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, गायब झाले आहे’ ही नवीन ओळ सरकारने शोधून काढली आहे. रोजगार गायब, १५ लाख रूपये गायब आणि आता राफेलची फाईलदेखील गायब झाली आहेराफेल कराराची मोदींनी बायपास सर्जरी केली आहे, अशी टीका आज राहुल गांधींनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.