मुंबई – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे राहुल यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. याला चोवीस तास पूर्ण होताहेत तोच राहुल गांधींचे संसद सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले.यावरून आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये बावनकुळे म्हणतात,”सत्यमेव जयते.. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. या देशात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही”
राहुल गांधींना शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय ?
राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते, “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे?” त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याने दावा केला की राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी होते आहे.
सत्यमेव जयते!
इस देश में संविधान से बढकर कोई नहीं है।
प्रधानमंत्री आदरणीय श्री. @narendramodi जी और ओबीसी समाज के बारे में अपनी टिप्पणी के लिए सूरत की एक अदालत द्वारा दोषी ठहराए जाने के बाद राहुल गांधी की लोकसभा सदस्यता रद्द कर दी गई।
सत्यमेव जयते !
संविधानापेक्षा या देशात…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 24, 2023
उद्धव ठाकरेंनी देखील दिली प्रतिक्रिया
“चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू – उद्धव ठाकरे”