मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे विधानसभेतील नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येत्या २७ जून रोजी महाराष्ट्र काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची नवी दिल्ली येथे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
विधानसभेच्या २८८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचा अंदाज असून राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे उपस्थित असणारा आहेत.
तत्पूर्वी, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला राज्यात केवळ एका जागेवर समाधान मिळाले आहे.