नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालमधील तणावग्रस्त परिस्थितीवर टिपणी करताना राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे, ‘मुद्दे आणि विचारधारेवर निवडणुकीची लढाई लढू. हिंसक आणि वेदनादायक प्रचार करु नये. ते देशाच्या राजकारणासाठी घातक आहे.’ अस ट्विट केलं होतं. राहुल गांधींच्या या समंजस्याच्या भूमिकेला 24 तास देखील उलटले नसताना त्यांनी आणखीन एक ट्विट केलं असून या ट्विटद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Yesterday @RahulGandhi said he favours a “new political language” to debate issues. 24 hrs later, Congress President returns as a social media troll. His incompetence to articulate real issues is evident in silly tweets. This marks @INCIndia‘s steep degeneration. Grow up Rahul! https://t.co/pmdCzBUGda
— Chowkidar GVL Narasimha Rao (@GVLNRAO) May 15, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie नावाचा नवीन शब्द आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट्स काढून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. त्यावरुन भाजपा प्रवक्ते जी.व्ही. एल नरसिंहराव यांनी ट्विटद्वारे राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे काँग्रेस पक्षाचीच अधोगती होत आहे. त्यामुळे राहुल मोठा हो असा टोला त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना लगावला आहे.’