राहुल गांधी यांच्या खेदाबद्दल भाजपकडून खोटारडेपणा ! ; कॉंग्रेसने पुन्हा दिला चौकीदारहीं चोरचा नारा

नवी दिल्ली: राफेल प्रकरणात नव्याने समोर आलेले पुरावे दाखल करून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रीया देताना राहुल गांधी यांनी जे विधान केले आहे त्याबद्दल त्यांनी सुप्रिम कोर्टापुढे खेद व्यक्त केला आहे. त्याचे भांडवल करून भाजपचे लोक राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी सर्रास माफी मागितल्याचा खोटा कांगावा करीत आहेत.

राफेल प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षांना सुप्रिम कोर्टात माफीनामा सादर केला आहे असे भाजपच्या प्रवक्‍त्याने पत्रकार परिषदेत नमूद केले आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी वरील प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की भाजपच्या खोटारडेपणाला कोणत्याहीं सीमा राहिलेल्या नाहीत. त्यांच्या बदनामीच्या मोहीमेलाही कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. त्यांनी राहुल गांधी यांनी कोर्टात दिलेल्या उत्तराचा विपर्यास करून कांगावा चालवला आहे. हे नमूद करतानाच त्यांनी एकही चौकीदार चोर है हा नारा पुन्हा दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.