राजकीय पक्षातील घराणेशाहीवर राहुल गांधींचे सडेतोड उत्तर

लंडन: राहुल गांधी यांच्यावर नेहमी टीका केली जाते की, त्यांना जे मिळाले आहे ते फक्त गांधी घराण्यात जन्मल्यामुळे आणि भारतातील राजकीय पक्षातील घराणेशाहीमुळे, अश्या प्रकारचा प्रश्न त्यांना लंडन येथे पत्रकाराने शनिवारी विचारला, त्यावर राहुल गांधींनी समर्पक उत्तर दिले.

काँग्रेस मधील घराणेशाही आणि गांधी कुटुंबाचा संपन्न भूतकाकाळाशी सांगड जोडत राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आले.  तुमच्याकडे तुमचे आडनाव नसते तर तुम्ही या पदावर असता का?  अश्या प्रकारचा प्रश्न लंडन येथे राहुल गांधींना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले, “ते शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही मला माझ्या गुणांसाठी, माझ्या क्षमतांच्या कसोट्यांवर तोलणार आहात की मी गांधी घराण्यातील आहे म्हणून निषेद करणार . हे शेवटी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पहिली गोष्ट, माझ्या वडिलांच्या निधनापासून माझ्या कुटुंबातील कोणीच सत्तेतील पद उपभोगले नाही. हे अनेकदा विसरले जाते.”

“मला मान्य आहे मी गांधी घराण्यात जन्मलो … ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते, मला तुम्ही माझ्याशी समस्यांवर बोला, परकीय धोरणांबद्दल बोला, अर्थकारणावर बोला, भारतीय विकास आणि शेतीवर मोकळेपणाने बोला. तुम्हाला जे वाटते ते प्रश्न मला मोकळेपणाने विचारा आणि त्या नंतर माझ्याबद्दल तुमचे मत बनवा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)