Atul Bhatkhalkar : पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी पाच देशांच्या दौर्याच्या अखेरच्या दिवशी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. बुधवारी 20 मे या दिवशी मेलडी आणि मोदींची भेट समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांनी ‘मेलडी’ चॉकलेट भेट दिल्याचा व्हिडिओ काल दिवसभर ट्रेंडमध्ये होता. मेलोनी यांनी ‘मेलडी’ चॉकलेट भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सध्या देशावर उर्जासंकट गडद होत चाललले आहे. इंधनाची टंचाई भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासींना संबोधित करताना बचत करण्याचं आवाहन केलं होतं. (Atul Bhatkhalkar ) आता स्वत: मोदी हेच इतर देशात जाऊन भेट देत असल्याने त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशावर मोठे आर्थिक वादळ घोंघावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये चॉकलेट वाटत असल्याची टीका करत निशाणा साधला होता. या टीकेनंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जंपुली आहे. मोदींवर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा समाचार भाजपकडून घेण्यात आला आहे. आता भाजपचे महाराष्ट्रातील आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेच्या थपडा खाऊन राहुल गांधी यांचा बधिर आणि विखारी मेंदू भिरभिरलेला दिसतोय, अशा शब्दांत भातखळकर यांनी राहुल गांधीवर टीका केली. प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेच्या थपडा खाऊन राहुल गांधी यांचा बधिर आणि विखारी मेंदू भिरभिरलेला दिसतोय. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गद्दार म्हणेपर्यंत टक्केवारी खानदानाचा हा वारसदार घसरलेला आहे. दुहेरी नागरिकत्व आणि उत्पन्नापेक्षा शेकडो पटीने मालमत्ता बनवल्याप्रकरणी… — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 21, 2026 तसेच त्यांनी एक मोठा दावा देखील केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकीय करियर संपण्याच्या टप्प्यावर आहे म्हणून हा सगळा थयथयाट सुरू आहे. राहुल गांधी लवकरच तुरुंगात दिसतील, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांचं ट्वीट (Atul Bhatkhalkar) प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेच्या थपडा खाऊन राहुल गांधी यांचा बधिर आणि विखारी मेंदू भिरभिरलेला दिसतोय. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गद्दार म्हणेपर्यंत टक्केवारी खानदानाचा हा वारसदार घसरलेला आहे. दुहेरी नागरिकत्व आणि उत्पन्नापेक्षा शेकडो पटीने मालमत्ता बनवल्याप्रकरणी न्यायालयाने याच्या विरोधात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. राजकीय करियर संपण्याच्या टप्प्यावर आहे म्हणून हा सगळा थयथयाट सुरू आहे. राहुल गांधी लवकरच तुरुंगात दिसतील. हेही वाचा : Rajya sabha election: राज्यसभेसाठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग ; देशभरातून ‘या’ उमेदवारांच्या नावांची चर्चा