राहुल गांधी उद्या ‘नाटकबाजी’साठी पंजाबमध्ये येणार – बादल

कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसलाही सुनावले

अमृतसर – वादग्रस्त कृषी विधेयकाच्या निषेधार्थ उत्तर भारतात निषेधाची जोरदार लाट उसळली आहे. पंजाब आणि हरियाणात जागोजागी रास्ता रोको करण्यात येत आहेत. अशातच उद्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाब व हरियाणातील शेतकरी आंदोलनांमध्ये सहभागी होणार आहेत. ते येथे ट्रॅक्टर रॅली आयोजित करणार असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या पंजाब व हरियाणा दौऱ्याबाबत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार टीका केली आहे.

“पंजाबमध्ये उद्या राहुल गांधीजी नाटकबाजी करण्यासाठी येणार आहेत. मुळात या कृषी विधेयकांची चर्चा प्रथम काँग्रेसच्या राजवटीतच सुरु झाली होती. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ते सत्तेत आल्यानंतर खासगी कृषी बाजारपेठा उभारू असं आश्वासन दिल होत.” अशी टीका बादल यांनी केली.


तत्पूर्वी, मोदी सरकारच्या तीन कृषी विधेयकांचा निषेध म्हणून अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक असलेल्या अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.