राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरूनच पाठवलं परत

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसह आज जम्मू-काश्‍मीरचा दौरा करणार होते. दरम्यान, राहुल गांधी आणि इतर सगळ्यांना श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं आणि तिथूनच त्यांना परत पाठवण्यात आलं.

सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आलं आहे. अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच काश्मीरचा दौरा करण्याचे ठरवले होते. मात्र, आता तो त्यांना रद्द करावा लागला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×