राहुल गांधी आता पप्पू राहिले नसून ‘गधो के सरताज’ – भाजप नेता 

नवी दिल्ली – सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात राफेलची कागदपत्रे हरवल्याची दावा केला. यावरून राजकारण तापले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल  गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. यानंतर आता भाजपने पलटवार करण्यास सुरुवात केली असून मध्यप्रदेश भाजप नेत्याची जीभ घसरली. राहुल गांधी आता पप्पू राहिले नसून ‘गधो के सरताज’ झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशचे भाजप नेते आकाश विजयवर्गीय यांनी केले आहे.

आकाश विजयवर्गीय म्हणाले कि, राहुल गांधींना आधी पप्पू या नावाने ओळखले जात होते, हे एक निरुपद्रवी आणि प्रेमळ नाव होते. परंतु आता त्यांचे वर्तन देशविरोधी होत आहे. त्यामुळे आपण त्यांचे नाव बदलून पप्पूऐवजी ‘गधो के सरताज’ ठेऊ’, असे त्यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.