केरळ- आगामी विधानसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या तीन दिवसाच्या केरळ दौऱ्यावर आहेत. आज पासूनच राहुल गांधींच्या केरळ दौऱ्याला सुरवात झाली आहे. राहुल गांधींनी आपल्या केरळ दौऱ्याबद्दल यापूर्वीच ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली होती.
दरम्यान, आज दौऱ्याच्या वेळी राहुल गांधींनी मलप्पुरम जिल्ह्यातील एका हॉटेल मध्ये थांबून आपल्या कार्यकर्त्यांबरोबर नास्ता केला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस राहुल गांधी केरळ मध्ये राहणार आहेत. वायनाड मधून विजयी झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच दौऱ्यावर गेले आहेत.
Kerala: Congress President Rahul Gandhi stops for tea at a shop in Chokkad of Malappuram district. He is on a three-day visit to the state, beginning today. pic.twitter.com/YP1Qgei6rR
— ANI (@ANI) June 7, 2019