राहुल गांधींनी काश्‍मीरमध्ये येवू नये

प्रशासनाचा ट्विट करत राहुल यांना रोखण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसह आज जम्मू-काश्‍मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्या अगोदरच जम्मू-काश्‍मीरच्या प्रशासनाने त्यांना राज्यात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांनी राज्यात आता येवू नये तसेच आम्हाला सहकार्य करावे अशा आशयाचे ट्विट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने ट्विट करत, राज्यात राजकीय नेत्यांच्या येण्याने मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण होण्याची शक्‍यता आहे तसेच राज्यात लागू असणाऱ्या निर्बंधांचे राजकीय नेत्यांकडून उल्लंघन होणार आहे. तसेच राज्यात बऱ्याच ठिकाणी अनेक निर्बंध लागू आहेत त्यामुळे दिग्गज नेत्यांनी परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. तसेच राज्यातील शांतता, व्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि लोकांच्या सुरक्षेचा विचार करून आपले येणे थांबवावे असे म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधी विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसह जम्मू-काश्‍मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्‍मीर दौऱ्यावर जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)