राहुल गांधींनी भाषेची मर्यादा राखावी – सुषमा स्वराज 

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भाषेच्या मर्यादेचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले गुरु लाल कृष्ण आडवाणींना चप्पल मारून स्टेजवरून खाली उतरवले, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यात केले होते. यावर सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून राहुल गांधींना हा सल्ला दिला आहे.

सुषमा स्वराज म्हणाल्या कि, राहुलजी आडवाणी आमच्या वडिलांसमान आहेत. तुमच्या वक्तव्याने दुःख झाले. कृपया भाषेची मर्यादा राखण्याचा प्रयत्न करा, असे ट्विट त्यांनी हिंदी आणि इंग्रजीतून केले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी 
नरेंद्र मोदी जिथेपण जातात तेथे कोणाबद्दल तरी वाईट बोलतात. मोदींचे गुरु कोण आहेत? आडवाणीजी. शिष्य गुरूंसमोर हातही जोडत नाही. स्टेजवरून फेकून दिले आडवाणींना. चप्पल मारून आडवाणींना स्टेजवरून उतरवले आणि हिंदू धर्माबद्दल बोलत आहेत. लोकांना मारले पाहिजे असे हिंदू धर्मात कोठे लिहले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हंटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.