राहुल गांधींनी लग्न करुन घर सांभाळावे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाषण असो किंवा पत्रकार परिषद, गंभीरतेपेक्षा त्यांच्या विनोदी शैली आणि कवितांमुळे जास्त गाजते. दोन दिवसांपूर्वी पुण्यात आठवले यांची पत्रकार परिषद होती.

त्यावेळी राफेल प्रकरणावरून राहुल गांधींकडून होणाऱ्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्या टीकेमुळे मोदी यांना काहीही फरक पडत नाही, कारण ते फकीर आहेत. राहुल गांधी यांनासुद्धा माझा सल्ला असेल, भविष्यात तुम्हाला काही चांगले काम करायचे असेल तर तुम्ही सुद्धा फकीर व्हा, पण ते होणार नाहीत. उलट त्यांनी लग्न करावे आणि चांगला संसार करावा. म्हणजेतेथे ते नक्कीच चांगले काम करतील असा मला विश्‍वास आहे.’ त्यांच्या या उत्तराने सगळीकडे मात्र हशा पसरला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.