राहुल गांधींनी शेतकऱ्यांची माफी मागावी- काँग्रेस आमदार

भोपाळ: आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह कायम चर्चेत असतात. आता त्यांचे बंधू आमदार लक्ष्मण सिंह यांनी देखील असेच एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. “राहुल गांधींनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी” असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

यावेळी आपल्याच सरकारवर टीका करताना आमदार सिंह म्हणाले की, “आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेत आलो होतो. मात्र आपण अद्यापपर्यंत या आश्वासनाची पुर्तता करू शकलेलो नाही. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने कमलनाथ सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज आहेत”, यासाठी राहुल गांधींनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. त्यामुळे काँग्रेस सरकारवर नाराज असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये योग्य संदेश जाईल.

 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×