‘त्या’ वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा… 

नवी दिल्ली – काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. या विधानावर भाजप खासदारांनी नाराजी व्यक्त केली असून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.

स्मृती इराणी म्हणाल्या कि, राहुल गांधी यांनी देशातील समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. असे विधान देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणी केले असेल. महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. राहुल गांधी यांचं हे वक्तव्य निंदनीय आहे आणि त्यांना याबाबत शिक्षा झाली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, झारखंडमधील एका प्रचारसभेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला बलात्काराच्या घटनेवरून घेरताना मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया झाल्याचे म्हंटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.