भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता वैमानिकाबाबत राहुल गांधी म्हणतात…

भारतीय सैन्य दलांवरील हल्ल्याचा आज पाकिस्तानतर्फे करण्यात आलेला प्रयत्न चांगलाच फसला आहे. आज सकाळी भारतीय वायू सीमेमध्ये प्रवेश करत पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय सीमेमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पर असलेल्या भारतीय वायुदलातर्फे जम्मू येथील राजोरी भागामध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडून हा हल्ला अयशस्वी करण्यात आला. भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाडण्याच्या कारवाई दरम्यान भारताचे मिग २१ हे विमान बेपत्ता झाले असून या विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता झाला आहे.

दरम्यान, पाकिस्तानतर्फे भारताचे बेपत्ता विमान व वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे वृत्त आल्याने भारतातून या वैमानिकाबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता वैमानिकाविषयी ट्विटरद्वारे काळजी व्यक्त केली असून ते म्हणतात, “आपल्या भारतीय वायुसेनेचा शूर वैमानिक बेपत्ता असल्याचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. मी आशा करतो की हा शूर वैमानिक लवकरच सुखरूप भारतात परतेल. अशा अवघड वेळी आम्ही सर्व भारतीय सैनेसोबत आहोत.”

1 Comment
  1. Arvind Ramchandra Gokhale says

    वरील बातमी पत्र वाचण्यात आले राहुल गांधी ह्यांनी जी हळहळ व्यक्त केली आहे त्या बाबत त्यांचे कवतूकच करावयास हवे पण ह्याच बरोबर त्यांनी त्यांच्या पक्षास व सर्वच विरोधी पक्षांना अशा कठीण प्रसंगी देशात शांतता राखण्यासाठी मोर्चे, आंदोलने, सरकारविरोधात जाहीर भाषणे व भाषणात कमरेचे सोडून डोक्याला बांधण्या योग्यतेची मुताफळं करू नये अशी समाज दिली असती तर अधिक योग्य ठाले असते कारण हि नुकतीच सुरवात झालेले आहे ह्याचा शेवट कशा प्रकारे होईल हे आताच सांगणे शक्य नाही त्यासाठी देशातील वातावरण सुद्धा संयमाचे , शांततेचे असणे हि काळाची गरज ठरत नाही का ?

Leave A Reply

Your email address will not be published.