राहुल गांधी यांची मानवाधिकार आयोगात धाव

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिस कारवाईच्या विरोधात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी राहुल गांधी यांनी सोमवारी मानवाधिकार आयोगात धाव घेतली.

प्रियंका गांधी आणि राहुल यांच्यासमवेत पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेही उपस्तिथ होते. कॉंग्रेसने मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ आणि कागदपत्रे आयोगाकडे दिली. सर्व नेत्यांच्या सह्या केलेले निवेदनही आयोगाला देण्यात आले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, देशभरात लोकांना बेदम मारहाण करण्यासाठी भाजप पोलिस मित्रांची भरती करीत आहेत. हे कृत घटनाविरोधी असल्याचे गांधी म्हणाले.

‘भारत असा देश होवू शकत नाही, जिथे देशाचे नेतृत्व करणारे जनतेसोबत दुरव्यवहार करतात. मानवाधिकार संस्थेने योग्य प्रकारे पडताळणी केली तर त्याना उत्तर प्रदेशात जनतेसोबत दुरव्यवहार झाल्याचे आढळून येईल

प्रियांका गांधी वड्रा यांनी यूपीमधील पोलिस मित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या पोलिसांचा मित्र होण्यासाठी काही पात्रतेचे निकष निश्चित केले गेले आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीची लांबी पाच फूट दहा इंचाची आणि ती व्यक्ती आरएसएसची असायला हवी.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here