राजस्थानमधील सत्तासंघर्षाला राहुल गांधी जबाबदार – उमा भारती

नवी दिल्ली – राजस्थानातील कॉंग्रेस सरकारमध्ये पायलट आणि गेहलोत गटांमधील सत्तासंघर्षाला राहुल गांधी जबाबदार असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठे होऊ देत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

उमा भारती म्हणाल्या कि, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये जे काही घडले त्यासाठी राहुल गांधी जबाबदार आहेत. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठे होऊ देत नाही. ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांसारख्या सुशिक्षित आणि सक्षम नेत्यांना उच्च पद मिळाल्यास ते मागे राहतील, असे राहुल गांधी यांना वाटते, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे काँग्रेसने सचिन पायलट यांचा दावा फेटाळून लावला असून आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.