राफेल करारावर चर्चा झाली नव्हती; पर्रीकरांच्या भेटीवर राहुल गांधींचे स्पष्टीकरण 

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भेटीवरही स्पष्टीकरण दिले. या भेटीत राफेल कराबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी मध्यंतरी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीत राफेल कराराबाबत चर्चा झाली असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. तर राफेलबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचा निर्वाळा पर्रिकर यांनी देत राहुल गांधींनी सत्य कथन करावे, विनंतीही केली होती. यावर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्टीकरण दिले. राहुल गांधी म्हणाले कि, मी मनोहर पर्रीकर यांना भेटलो होतो. परंतु, या भेटीत राफेल करारावर कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच पर्रीकरांच्या भेटीचा अर्थ असा नाही कि मी नरेंद्र मोदींना याविषयी प्रश्न विचारणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.