मोदी सरकारचा हा निव्वळ ‘खयाली पुलाव’

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली -भारतात कोविड-19 चे  रुग्णांचे  प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 50,20,360 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी

”कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने खयाली पुलाव केले. 21 दिवसांमध्ये कोरोनावर मात करू, आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे संरक्षण होईल, 20 लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र संकटातील संधी हे एक सत्य होतं” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.