नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते 4 जूनला अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात भाषण करतील. राहुल यांच्या दौऱ्याची माहिती इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसच्या सुत्रांकडून देण्यात आली. त्या दौऱ्यात राहुल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार असल्याचे समजते.
याआधी मार्चमध्ये राहुल यांनी ब्रिटनचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी भारतीय लोकशाहीविषयी भाष्य केले होते. त्यावरून भारतात मोठे राजकीय वादंग निर्माण झाले.
भाजपने परदेशी भूमीत भारताची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप राहुल यांच्यावर केला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी भूमीत भारतातील राजकीय मुद्दे उपस्थित करत असल्याची उदाहरणे पुढे करून कॉंग्रेसने पलटवार केला.