Rahul Gandhi on PM Modi । 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. प्रथम सभागृहात राष्ट्रगीत झाल्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिली शपथ पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मात्र पंतप्रधानांच्या शपथेवेळी विरोधी बाकावर बसलेल्या राहुल गांधी यांनी केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव शपथेसाठी पुकारले गेले तेव्हा विरोधकांनी NEET-NEET, शेम शेम’ असे म्हणण्यास सुरुवात केली. पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मोदी -राहुल गांधी पहिल्याच दिवशी आमने-सामने Rahul Gandhi on PM Modi ।
दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान मोदींनी सभागृहात बसलेल्या सर्व खासदारांना हात जोडून अभिवादन केले. यावेळी राहुल गांधीही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात बसले होते.त्यावेळी त्यांना संविधानाची प्रत दाखवत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यानंतर त्यांनी हसत आणि हात जोडून पंतप्रधान मोदींच्या अभिवादनाला उत्तर दिले. याशिवाय सभागृहात उपस्थित असलेल्या इतर खासदारांनीही पंतप्रधान मोदींचे हात जोडून अभिवादन स्वीकारले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi takes oath as a member of the 18th Lok Sabha. pic.twitter.com/3tjFrbOCJ0
— ANI (@ANI) June 24, 2024
इंडिया आघाडीकडून संविधानाची प्रत घेऊन निषेध Rahul Gandhi on PM Modi ।
दुसरीकडे, 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. प्रोटेम स्पीकर आणि नीट पेपर लीक प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. या सगळ्यात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेबाहेर मोर्चा काढला. यानंतर सर्व विरोधी खासदार संविधानाची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भत्रीहरी महताब यांना प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. यानंतर प्रोटेम स्पीकरांनी सर्व खासदारांना शपथ देण्यास सुरुवात केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 280 खासदार शपथ घेणार आहेत.
हेही वाचा
‘इंडिया’ आघाडीचे खासदार संविधानाची प्रत घेऊन संसदेत का पोहोचले? ; राहुल गांधींनी सांगितलं कारण