Rahul Gandhi on pm modi । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधानांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करार देखील झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान , दोन्ही देशातील नेत्यांनी या कराराची आणि भेटीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याच पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ शेअर करून काँग्रेसकडून पंतप्रधानांनी लक्ष्य करण्यात आले आहे.
काँग्रेसकडून मोदींचा व्हिडीओ शेअर Rahul Gandhi on pm modi ।
पंतप्रधानांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात त्यांना गौतम अदाणीयांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या याच उत्तरवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
देश में सवाल पूछो तो चुप्पी,
विदेश में पूछो तो निजी मामला!अमेरिका में भी मोदी जी ने अडानी जी के भ्रष्टाचार पर पर्दा डाल दिया!
जब मित्र का जेब भरना मोदी जी के लिए “राष्ट्र निर्माण” है, तब रिश्वतखोरी और देश की संपत्ति को लूटना “व्यक्तिगत मामला” बन जाता है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2025
…तर ती वैयक्तिक बाब आहे! Rahul Gandhi on pm modi ।
अमेरिकेतील अदानी ग्रुपबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या उत्तरावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर करत,”जर तुम्ही देशात प्रश्न विचारला तर त्यावर मौन असते आणि जर तुम्ही परदेशात प्रश्न विचारला तर ती वैयक्तिक बाब आहे! ” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. पुढे बोलताना त्यांनी,”अमेरिकेतही पंतप्रधान मोदींनी अदानींचा भ्रष्टाचार झाकला! जेव्हा पंतप्रधान मोदींसाठी मित्रांचे खिसे भरणे हे राष्ट्रनिर्माण असते, तेव्हा लाच घेणे आणि देशाची संपत्ती लुटणे ही त्यांची वैयक्तिक बाब बनते.” असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
अमेरिका में पत्रकार ने नरेंद्र मोदी के परम मित्र अडानी के भ्रष्टाचार से जुड़ा सवाल किया.
नरेंद्र मोदी इसे व्यक्तिगत मामला बताते हुए इधर-उधर की बात करने लगे. सवाल सुनते ही चेहरे का रंग उड़ गया.
• अडानी को लेकर श्रीलंका, केन्या, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया और कई देशों में जांच चल… pic.twitter.com/2TNctqVmTh
— Congress (@INCIndia) February 14, 2025
अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
अमेरिका दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत, एका पत्रकाराने अदानीशी संबंधित प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला. पत्रकाराने विचारले, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीत गौतम अदानी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांवर काही चर्चा झाली का?”
यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले की, “भारत हा एक लोकशाही देश आहे आणि आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ ची आहे. आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. मी प्रत्येक भारतीयाला माझा स्वतःचा मानतो. अशा वैयक्तिक बाबींसाठी दोन्ही देशांचे प्रमुख भेटत नाहीत, बसत नाहीत किंवा बोलत नाहीत.” असे म्हणत सडेतोड उत्तर दिले.
अदानींविरुद्ध वाद आणि राजकीय आरोप
गौतम अदानी यांच्या व्यावसायिक साम्राज्यावर विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अदानी समूहावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप करत आहेत. विरोधकांचा आरोप आहे की अदानी समूहाला सरकारी मदत आणि धोरणात्मक फायदे मिळाले आहेत.
मात्र यावर केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, सर्व धोरणात्मक निर्णय पारदर्शक आहेत आणि कोणत्याही उद्योगपतीला कोणतेही विशेष फायदे देण्यात आलेले नाहीत. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर अदानी मुद्द्यावरील वाद अधिक तीव्र झाला आहे. भाजप याला विरोधकांचा खोटा प्रचार म्हणत आहे, तर काँग्रेस याला मोदी सरकारच्या ‘मैत्री धोरणाचा’ भाग म्हणत आहे.