Rahul Gandhi Maharashtra Visit | काँग्रेसचे नेते, खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण महर्षी महाराष्ट्राचे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि ‘लोकतीर्थ’ स्मारकाचे अनावरण करण्यासाठी राहुल गांधी सांगली जिल्ह्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून पश्चिम महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शनही केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून याची जोरदार तयारी केली जात आहे.
पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला
दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांनीच स्थापन केलेल्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दहा एकर जागेवर त्यांचे भव्य स्मारक साकारले आहे. या परिसरात पतंगराव कदम यांचा १८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. काँग्रेस नेते आणि पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांच्या संकल्पनेतून हे स्मारक साकारण्यात येत आहे. Rahul Gandhi Maharashtra Visit |
कसा असेल कार्यक्रम?
राहुल गांधी सांगलीला जाण्यापूर्वी नांदेड येथे जाऊन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. नांदेडहून थेट कोल्हापूरला विमानाने जाणार असून, कोल्हापूरमधून हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. Rahul Gandhi Maharashtra Visit |
कैलासवासी पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली आहे. कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांची जाहीर सभाही होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे. Rahul Gandhi Maharashtra Visit |
हेही वाचा:
अखेर जयदीप आपटेला अटक; कुटुंबियांनी भेटायला आला अन् पोलिसांनी घेतले ताब्यात