Rahul Gandhi on Budget । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी कोणत्याही तरतुदी नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
अर्थसंकल्पात मध्यमवर्गाच्या पाठीत आणि छातीत वार Rahul Gandhi on Budget ।
लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी, 2024 च्या अर्थसंकल्पात भांडवली नफा कर वाढवल्याबद्दल आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी निर्देशांक समाप्त केल्याबद्दल मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, “या अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गाच्या पाठीत आणि छातीत वार केले आहे.
विरोधी पक्षनेते म्हणाले, “इंडेक्सेशन सुविधा रद्द करून सरकारने मध्यमवर्गीयांच्या पाठीत खंजीर खुपसला असून शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये वाढ करून सरकारने मध्यमवर्गाच्या छातीत वार केला आहे.”असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
त्यासोबतच त्यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख केला. ते म्हणाले,“हजारो वर्षांपूर्वी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे चक्रव्यूहमध्ये अभिन्युची 6 जणांनी हत्या केली होती. चक्रव्यूहात भीती, हिंसाचार असतो आणि अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून सहा जणांनी मारले.
“चक्रव्यूहचे दुसरे नाव पद्मव्यूह” Rahul Gandhi on Budget ।
पुढे राहुल गांधी म्हणाले,”जेव्हा मी चक्रव्यूहबद्दल संशोधन केले तेव्हा मला कळले की त्याचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे. तो कमळाच्या आकारात आहे. 21व्या शतकात एक नवीन चक्रव्यूह तयार झाले आहे, तेही कमळाच्या चिन्हात आणि पंतप्रधान त्याचे चिन्ह छातीवर धारण करतात. चक्रव्यूहात जे अभिमन्यूचे झाले, तेच शेतकरी माता-भगिनींच्या बाबतीत होत आहे.” असे म्हटले.