राहुल गांधी यांनी सोनिया गांधीची घेतली भेट

लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ मतदारसंघांत सात टप्प्यांत मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत भाजपला बहुमताची संधी मिळत असल्याचे वृत्त आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीमध्ये पिछाडीवर असून त्यांनी वायनाड मध्ये मोठी आघाडी घेतली आहे. तसेच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेरी मधून आघाडीवर आहेत.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमध्ये राहुल गांधी व स्मृती इराणी यांच्यामध्ये चुरस पाहायला भेटत असून आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. भाजप उमेदवार स्मृती इराणी यांना 14043 मतं मिळाली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 1412 मतं मिळाली आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.