राहुल गांधी अजूनही लहान – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली –पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राहुल गांधी यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधी यांनी प्रचार सभेत ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली होती. याच टीकेवर बॅनर्जींनी पलटवार केला असून राहुल गांधी अजूनही लहान आहेत, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर आरोप केले होते कि, ‘ममतांच्या राज्यात नाही झाला विकास’ या आरोपांबाबत ममता बॅनर्जी यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘राहुल गांधी अजूनही लहान आहेत. मी त्यांच्या आरोपांवर काय बोलणार? तसेच किमान उत्पन्नासंदर्भात काँग्रेसच्या घोषणेवर आम्ही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)