राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत? काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून पंतप्रधानपदाच्या चर्चांना जोर पकडला आहे. अशातच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, पण एनएनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, असे आझाद यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाची इच्छा सोडली कि काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

गुलाम नबी आझाद म्हंटले कि, काँग्रेस पक्षाला सहमती मिळाली तर आम्ही नेतृत्व करू, असे आम्ही याआधीच आम्ही स्पष्ट केले आहे. परंतु, एनएनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचे हेच आमचे लक्ष्य आहे. आम्हाला सर्वानुमते घेतलेला निर्णय मान्य असेल, असे त्यांनी सांगितले आहे. गुलाम नबी आझाद यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी पंतप्रधान पद सोडण्यासाठी तयार आहे, असे संकेत मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.