अमेठी: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आजी उत्तरप्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत अर्ज भरताना गांधी कुटुंबातल्या सर्व सदस्यांची उपस्थिती. सोनिया,प्रियंका,रॉबर्ट वढेरा यांच्यासह रेहान, मियारा यांचीही उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल यांचा रोड शो पार पडला. मागील 15 वर्षांपासून ते लोकसभेत अमेठीचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील वेळेप्रमाणेच यावेळीही राहुल यांच्याविरोधात भाजपने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. मागील वेळी राहुल यांनी लाखभरापेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी राहुल दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहेत. दुसरा मतदारसंघ म्हणून त्यांनी केरळच्या वायनाडची निवड केली. तिथून त्यांनी मागील गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.