भाजपकडून सूडभावनेने शरद पवारांना लक्ष्य करण्यात येतय – राहुल गांधी

नवी दिल्ली – “भाजपाकडून सूडभावनेने शरद पवारांना लक्ष्य करण्यात येत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या एक महिनाआधी कारवाई करण्यात येत आहे”, यावरून त्यांनी सरकारवर आगपाखड केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी शरद पवारांविरोधात होत असलेल्या कारवाईवरुन टीका करत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “भाजपाकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी कारवाई केली जात आहे. सरकारच्या सूडभावनेचा निषेध आहे”.

राहुल यांनी शरद पवार यांना फोन करून पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च दुपारी 2 वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचे बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)